Header Ads Widget

नांदेड लोकसभा मतदार संघात दोन पाटलात लढाई होणार असल्यामुळे मतदारों के दिल चुराएंगे !!

                   माधव पवार
अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघात नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यात अटीतटीची निवडणूक होणार असल्यामुळे हे दोन्ही उमेदवार मतदार के दिल चुराएंगे असा सवाल मतदारातून केला जात आहे

राज्यातील नांदेड लोकसभा मतदार संघात असलेले धन दांडगे नेते मंडळी सध्याच्या परिस्थिती मध्ये भाजपा पक्षात प्रवेश करून काँग्रेस पक्ष कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत

तरी येणाऱ्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक लढविण्यासाठी तयार असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी रिंगणात लंगोट घातली आहे

नांदेड लोकसभा मतदार संघाची निवडणुकी ही दोन धन दांडग्या पुढार्‍याची होत असल्यामुळे मतदारातून कमालीची चर्चा होत असली तरी या दोन्ही उमेदवारांपैकी कोणता उमेदवार योग्य असा विचारही ग्रामीण भागात मतदार करीत आहे

भाजप पक्षाच्या माध्यमातून खासदार प्रताप पाटील चिखलीकर व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यामुळे निवडणुकीला रंग येणार आहे 



Post a Comment

0 Comments