Header Ads Widget

झाशीची राणी लक्ष्मीबाई जशा रणभूमी लढल्या तशाच पद्धतीने वाढोणा येथे घेतलेल्या शंकर पटात शूर महिला गाजवल्या !!


हिमायतनगर - नागोराव शिंदे

भारत मातेच्या खुशीत जन्मास आलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या लढाऊ व्यक्तिमत्वामुळे १८५७ साली झालेल्या उठावाच्या स्मृती भारतीयांच्या मनामध्ये वारंवार ठळक होत राहतात १८५७ च्या उठावात लढणाऱ्या नानासाहेब पेशवे,तात्या टोपे यांच्या प्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाईचं एक वेगळं स्थान  आहे
शंकर पटाच्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या शूर महिलेचे नाव सीमा पाटील ज्ञानगंगापूर तहसील खांबगाव जिल्हा बुलढाणा ह्या गेल्या अनेक वर्षा पासून म्हणजे २५ वर्षा पासून सहभागी होऊन दर वर्षी १०० ते २०० स्पर्धे मध्ये भाग घेऊन घेत असते सदरच्या महिलेला मिळाले चाळीस ट्रॉफी व ४० प्रसिद्धीपत्र असल्याचे ही ह्या महिलेने सांगितले आहे 

झाशीच्या राणी प्रमाणे या महिलेची तुलना करण्यात येत नसली तरी सध्याच्या परिस्थिती मध्ये एक शूर महिला शंकरपटामध्ये विशेष भाग घेऊन शंकर पट गाजवतो अशा महिलांचा सर्वत्र गौरव करण्यात येत  आहे
झाशीची राणी यांच्या बदल आदराची भावना सर्व सामान्य भारतीयांच्या मनात असते सध्याच्या परिस्थितीमध्ये पुरुषाच्या तुलनेत पाहिले तर महिला आघाडीवर आहेत सदरच्या महिला ह्या विविध स्पर्धे मध्ये भाग घेऊन मर्दानी खेळ खेळत आहेत

तशाच पद्धतीने नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील वाढोणा येथे भरवण्यात आलेल्या शंकर पटा मध्ये एका शूर महिलेने सहभाग घेतला होता या मध्ये बैलगाडा हे शंकर पट चांगल्याच गाजवले आहेत

उठावा नंतर ही एक प्रेरणा स्थान म्हणून राणी लक्ष्मीबाईंना आज ही मानलं जात इतिहास कादंबऱ्या कविता मधून त्यांच वर्णन केले जाते राणी झाशीची राणी यांच्या तुलनेमध्ये जरी हा विषय येत नसला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये सदरची ही महिला शंकर पटा सारख्या खेळा मध्ये विशेष सहभाग घेऊन महिला म्हणजे काय असते हे सर्वांना दाखवून देत आहेत 


Post a Comment

0 Comments