लोकसभेच्या निवडणुकी मध्ये मतदार राजा एका मताच्या दिलेल्या अधिकारातून तो राजकीय नेता कोणत्या ही पक्षांचा असला तरी या भल्या भल्या नेत्याची झोप उडवणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्याच्या परिस्थिती मध्ये दिसून येत आहे
आज पर्यंतच्या काळात राज्या मध्ये राजकीय नेते मंडळीचा चांगलाच खेळखंडोबा झाला असल्यामुळे त्यातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्यामुळे आता मतदार बांधव भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला एका मताचा अधिकार हा बजावणार आहेतया राज्या मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही पिक विम्याची रक्कम मिळत नाही अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये बऱ्याच पैकी आज पर्यंत केवायसीच्या नावाखाली एक रुपडा जमा करण्यात आला नाही विकासाचे तीन तेरा त्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत
राजकीय पुढार्यांना मतदाराना मत मागण्यासाठी जनतेच्या दरबारात जावे लागणार असली तरी त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे ही द्यावे लागणार असल्याने मतदार राजा हा सुज्ञान असल्यामुळे असल्यास प्रकारचा मताचा गैरवापर न करता विकासाला मत देतील असेच म्हणावे लागणार आहे

0 Comments