महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर मोठ्या पुढाऱ्यासह खेड्या पाड्यातील ही छोटे मोठे कार्यकर्ते ही भाजपा पक्षात प्रवेश करत असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे महत्व कमी होत असले तरी काँग्रेस पक्षाला कसल्याच प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा पंजा सोडला आणि भाजपाचे कमळ हाती धरले खासदार अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यामुळे काँग्रेस पक्षाची टीम भाजपाच्या वाटेने जात असल्याचे सरळ सरळ चित्र दिसून येत असून खासदार अशोकराव चव्हाण यांच्यामुळे चांगलेच ग्रहन लागले आहे
खासदार अशोकराव चव्हाण भाजपात गेले आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ही भाजपाची वाट धरित असल्यामुळे कमालीची चर्चा होत असल्यामुळे नायगाव तालुक्यातील रुई बु येथील सामाजिक कार्यकर्ता भगवान पांडुरंग वाघमारे यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केल्याचे दिसून येत आहे
काँग्रेस पक्षाला आता खेड्या पाड्यात ग्रहण छोटे मोठे कार्यकर्ते ही भाजपाच्या वाटेने - माजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते भगवान वाघमारे यांनी भाजपात प्रवेश केला आहे

0 Comments