राज्यासह ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाचा रोष वरचेवर राजकीय नेत्यासह पुढाऱ्यावर वाढत जात असल्यामुळे नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत असून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यावर मराठा समाजाचा प्रचंड रोष वाढला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
राज्यात काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागत असल्यामुळे लोकप्रतिनिधी आपापल्यात तयारीला लागत असल्याचे दिसून येत असले तरी एकीकडे सकल मराठा समाजा मध्ये जिल्ह्यातील राजकीय नेत्यासह राजकीय पुढाऱ्यांच्या संदर्भात मोठा रोष व्यक्त केला जात असून खेड्यापाड्यात राजकीय पुढाऱ्याचे सप्ताहाच्या निमित्ताने पुढाऱ्याचे बॅनर लावले जात आहेत
राजकीय पुढाऱ्यावर मराठ्यांचा संताप असल्यामुळे कुठे कुठे लावलेले राजकीय पुढाऱ्याचे बॅनर काढून टाकल्या जात असल्यामुळे सकल मराठा समाजाच्या रोषाला येत्या लोक सभेच्या निवडणुकी मध्ये राजकीय पुढाऱ्याना सामोरे जावे लागणार आहे

0 Comments