Header Ads Widget

काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्या !!

         माधव पवार
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडून भाजपा पक्षात प्रवेश केला असला तरी नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस संपली असे होत नाही एक चव्हाण भाजपा पक्षात गेले असले तरी दुसरा चव्हाण काँग्रेस पक्षातच आहे

सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष मोडकळीस आलेल्या काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान वसंतराव चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली होती

राज्यात निसर्गा तील ऋतूप्रमाणे रंग बदलणारे राजकीय नेते मंडळी व पुढारी या पक्षातून त्या पक्षात भरारी मारत असले तरी काँग्रेस पक्षाचा स्वाभिमान असलेला नेता म्हणजे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे एकमेव आहेत हे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना संधी देण्यात होती त्या संधीचे सोने करून नायगाव विधानसभा मतदार संघाचा विकास केला आहे

त्याच धर्तीवर यांना लोकसभेच्या निवडणुकी मध्ये नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी माजी आमदार चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे 




Post a Comment

0 Comments