Header Ads Widget

निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने लोहा पोलिसांची शहरात विविध ठिकाणी नाकाबंदीत ६० वाहने जप्त लोहा पोलिसांची कारवाई अनेक वाहनांची चेकिंग

                  माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत विदाऊट लायसन विदाऊट आरसी बुक विदाऊट नंबर फॅन्सी नंबर अशा वाहन धारकांवर मोठ्या प्रमाणात लोहा पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे सदरच्या गाडीवर नंबर न टाकणारे संशयास्पद वाहने  अशी लोहा पोलिसांनी एकूण ६० वाहने जप्त केली असून गाडी मालक त्याचे आधार कार्ड गाडीची कागद पत्र पाहूनच खात्री करूनच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करूनच सदरच्या गाड्या सोडण्यात येत आहेत अशी माहिती मिळते आहे सदरच्या ठाण्याच्या अंतर्गत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याच्या विरोधात सुद्धा विशेष मोहीम राबविण्यात येत असून यासाठी ब्रेक आनालायझर मशीनचा वापर करण्यात येत आहे.

सदर नाकाबंदी दरम्यान १४ लोकांची ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी करण्यात आली असून वाहना मध्ये दारू पैसा साहित्य वाहतूक होत आहे का ?लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी याबाबत विशेष करून चेकिंग सुरू आहे.

.आचारसंहितेचा भंग करणाऱ्या कुठल्याही कृतीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments