हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातून जाणारा पळसपुर डोलारी मार्गे शिरपली रस्ता हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता
परंतु सदरील गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्यावरील तिन्ही गावच्या लोकांना उपोषणाला बसण्याची वेळ आणणाऱ्या प्रशासनावर योग्य ती कारवाई करून या रस्त्याचे काम पूर्ण करा या मागणीसाठी पळसपुर डोलारी सिरपली येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण अवलंबल्याने त्या उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पहिल्या दिवसापासून या ठिकाणी हिमायतनगर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ रस्त्यावर उपोषण सुरू करण्यात आले आहे
या साखळी उपोषणकर्ते नागोराव शिंदे, डॉ मनोज राऊत, साहेबराव कदम, बंडू पवार मधुकर वाडेकर, रमेश कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती
हिमायतनगर येथील संतोष दादा गाजेवार, हिमायतनगर चे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे , किसनराव वानखेडे यांच्या सह पळसपुर डोलारी सिरपली येथील शेकडो नागरिकांसह महिला पण या उपोषणाला बसणार असल्याचे नागोराव शिंदे यांनी सांगितले आहे

0 Comments