काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठीने नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांना काही महिन्यात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी पक्ष श्रेष्ठीनी खासदारकीची उमेदवारीची संधी द्यावी असे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यातून मागणी केली जात आहे
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण हे काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी व बळकट करण्यासाठी व पक्षाला बळ देण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने लोकसभेच्या निवडणुकी मध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी माजी आमदार चव्हाण यांना उमेदवारी देणे आवश्यक असल्याची चर्चा होत आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजप पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर काँग्रेस पक्षाला सुरुंग लागली काय ? असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु नायगाव विधानसभा मतदार संघातून अनेक वेळा निवडून गेलेले माजी आमदार वसंतराव चव्हाण हे काँग्रेस पक्ष टिकवून ठेवण्यासाठी कसल्याच प्रकारचा पक्ष बदलीचा विचार केला नाही अथवा करत नाहीत असे वाटत असल्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मा. वसंतराव चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे

0 Comments