Header Ads Widget

अदृश्य शक्ती अन् धनशक्तीचा आगामी निवडणूकीत निश्चित अंत होणार माजी आ.वसंतराव चव्हाण !!

      दिलीप वाघमारे
राजकीय प्रवास पहाता यापूर्वी नायगाव विधानसभा मतदारसंघात जनतेच्या पाठबळावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवून काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठींबा दिला.तेव्हा पासून पक्षाचे कामे प्रामाणिकपणे करत वेळोवेळी सामान्य जनतेला न्याय मिळवून दिलाआहे
त्यामुळे आत्ता काँग्रेस पुढे अदृश्य शक्ती असो अथवा कुठल्याही धनशक्ती असेल आगामी निवडणूकीत निश्चित अंत होणार असून सामान्य जनतेच्या पाठबळावर लोकसभेच्या निवडणूकीत माजी आ.वसंतराव चव्हाणांनी शुक्रवारी नरसी मधून निवडणूकीचे राणशिंग फुकले आहे.
   
गुरुवारी महाविकास आधाडीच्या वतीने पहिल्या यादीत नांदेड लोकसभेसाठी माजी आ.वसंतराव चव्हाणांची उमेदवारी जाहीर केली.त्या अनुषंगाने उमरी धर्माबाद येथील नियोजित कार्यक्रमास जात असतांना नरसी येथे काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष यांनी अलोट गर्दीत ढोल ताशांच्या गाजऱ्यात नरसी मध्ये माजी आ.वसंतराव चव्हाणांचे जोरदार स्वागत केली.
 
सत्कारला उत्तर देताना माजी आ.चव्हाण म्हणाले मी आमदार असतांना नरसी सर्कलचा विकास मी प्रामुख्याने करत या भागातील समस्या बारकाईने सुडविण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे आत्ता कुठल्याही धनशक्ती असो अथवा अदृश्य शक्ती असेल सामान्य जनतेच्या पाठबळवर मी लोकसभेच्या निवडणूकीत माझी उमेदवारी दाखल करणार आहे

आता पासूनच आपापल्या परीने आपल्या परिसरातील नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊन काँग्रेस पक्षाचे हात बळकट करा,असे आशावादी उदगार माजी आ.वसंतराव चव्हाणांने काढून पक्षाचे राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी,राष्ट्रीय अध्यक्ष खरगे,राहुल गांधी,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले सह संबंध जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधीचे चव्हाणांनी ऋण व्यक्त केले
   
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर भिलवंडे,प्रा.रवींद्र पाटील चव्हाण, डॉ मधुकर राठोड, माजी सरपंच शेख नवाब सब,सय्यद इसाकभाई,बाबू भाई मॅकानिक, बाबासाहेब शिंदे,माणिक चव्हाण,शेख जब्बार,वसीम पटेल, एन डी,नरसीकर आदी उपस्थित होते 

यावेळी सुधाकर भिलवंडे,डी.के हनवटे, जळबा सुर्यवंशी, लालाबा सुर्यवंशी, गंगाधर भेदे,बालाजी भिलवंडे,कुंचेलीकर पटेल,शेख राऊफ, बावलगावे,मधुकर ताटे, गणेश भिलवंडे, बालाजी मेंटकर,माधव कोरे,पांडुरंग बागडे,अनिल कांबळे, शेख सत्तार सह नरसी सर्कल मधील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments