Header Ads Widget

सरकार गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानावर बिपीटी सारखे तांदूळ का ? देत नाही सडे तांदूळ देऊन मोफत दिल्याचे सांगतात !!

         माधव पवार
भाजपाच्या राजवटीत ग्रामीण भागात गोरगरीब मजुरांसाठी रोजगार हमी योजनेचे काम चालू नसल्याने अन्य राज्य मध्ये जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी कामे करावी लागत असून गेल्या काही वर्षाखाली राजगार हमी योजनेचे कामे चालू होती त्यावेळी रोजगाराना त्या कामातून गहू तांदूळ मिळत होते आणि हाताला काम मोठया प्रमाणात होते असे मजूरातून बोलल्या जात आहे 

सरकार या देशातील व राज्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानावर बिपीटी सारखे तांदूळ का ? देत नाही सडे तांदूळ देऊन मोठा तिर मारल्या सारखे गोरगरीब लाभार्थ्यांना कोपणच्या तांदूळाची लालूच दाखविली नुसते तांदूळ गहू देऊन गरिबाचे पोट भरत नाही त्यांच्या हाताला काम हवे आहे

सध्याच्या परिस्थिती मध्ये देशात काँग्रेस पक्ष भाजपावर खापर फोडते तर भाजपा पक्ष काँग्रेसवर खापर फोडून आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करते परंतु या देशातील व राज्यातील शेतकरी व शेतमजूर वर्गांचे काय ? असा प्रश्न चर्चेला जात असला तरी शेतकऱ्यांच्या सोयाबीन मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण होत आहे

काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात बंड टाकणे नाले सरळलिंग पाझर तलावाचे कामे दगडाचे बंधारे पाणी आडवा पाणी जिरावा सिल्टचे कामे रस्त्यावरचे कामे शेत लेवल करणे आदी कामे मजुराच्या हाताने करत होते त्याचे पेमेंट १५ दिवसाला होत होते तरी मजूर वर्ग समाधान होता असे सांगत आहेत

या भाजप सरकारच्या कार्यकाळात रोजगार हमी योजनेचे कामे असले तरी मजुरा विना जेसीबीच्या साह्याने कामे करून घेऊन या नावाने देयके काढतात एकीकडे मजूर उपाशी दुसरीकडे मजुराच्या हाताला काम नसल्यामुळे मजुर हैराण होत असला तरी सरकार स्वस्त धान्य दुकानावर सडक्या स्वरूपाचा तांदूळ व गहू देऊन लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे 


Post a Comment

0 Comments