Header Ads Widget

शहरासह १५ गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर ! पैनगंगा नदी कोरडी ठाक : पाण्याचा प्रश्न गंभीर !!

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिमायतनगर  उन्हाची तीव्रता कित्येक पट्टीने वाढली असल्याने सर्वच ठिकाणच्या नैसर्गिक पाणवठ्याचे वेगाने बाष्पीभवन झाले असून, सध्याला पाणीटंचाईच्या झळा सर्वत्रच जाणवत आहेत.

तालुक्यांच्या सिमारेषेवरून वाहणारी पैनगंगा नदी कोरडीठाक पडली असल्याने नदी काठावरील जवळपास १५ गावाचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात चालू असलेल्या जलजिवन मिशन अंतर्गतच्या कामाला वेग अथवा गती नसल्याने तिव्र पाणीटंचाईचा प्रश्न स्थानिक हिमायतनगर शहरांसह ग्रामीण पातळीवर निर्माण झाला आहे

हिमायतनगर शहराचा कायमस्वरूपी पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याकरीता १९ कोटी रूपयांची सार्वजनीक नळ योजना पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. आणि पैनगंगा नदी वर जवळपास दोन वर्षांपासून काम सुरू आहेत. शहरातील रस्ते पाईप लाईन करण्यासाठी फक्त रस्ते खोदून ठेवले एवढेच काम या योजनेचे दिसून येत आहे. १९ कोटी रूपये निधी कुणाच्या घश्यात गेला हा या ठिकाणी मोठ्या संशोधनाचा विषय ठरत आहे.

पाण्यासाठी भटकंती ■ सध्याला या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पैनगंगेला पाणीच नसल्याने मानवासह वन्य प्राणी पाण्यासाठी वनवन भटकत आहेत

या बाबींकडे जिल्हाधिकारी नांदेड व यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ लक्ष पुरवून पैनगंगेला इसापूर प्रकल्पांतून पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी या भागातील नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments