महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून नुकताच भाजपा पक्षात प्रवेश केल्याने नांदेड जिल्ह्याचा राजकीय रंगच उडाला असल्याची चर्चा ग्रामीण भागात ऐकावयास मिळत असून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये चढला जाणारा राजकीय रंग फिकट पडणार असल्याचे स्पष्ट जनतेतून बोलल्या जात आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात असताना नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात राजकीय खडा जंगी होऊन आयोजित करण्यात आलेल्या मोठ मोठ्या सभे मध्ये राजकीय रंग चढत होता
खरे तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपा पक्षात प्रवेश केला असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात खरोखरच राजकीय रंग उडाला असल्याचे जनतेतून स्पष्ट बोलल्या जात आहे
परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपा पक्षात गेले असल्याने व खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपा पक्षाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून नेतृत्व करीत असल्यामुळे सदरच्या निवडणुकी मध्ये के रंग येणार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
लोकसभेच्या निवडणुकी मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी तगडा काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे उमेदवार म्हणून राहू शकतात ? अशी सुद्धा चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी भाजपा पक्षाच्या माध्यमातून अशा उमेदवारांना टक्कर देण्यासाठी कोणता उमेदवार जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

0 Comments