Header Ads Widget

घुंगराळा गावच्या विकासाला गती वसंत पाटील सुगावे यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या शिफारशी नुसार २ कोटी ०५ लक्ष रुपयांचा खेचला निधी

        माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा घुंगराळा गावचे सरपंच वसंत सुगावे पाटील यांच्या प्रयत्नातून घुंगराळा येथे २ कोटी ०५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला  व इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी ) लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजनेतून २२   घरकूल मंजूर करण्यात आले आहेत 
             
ग्रामीण भागातील कामे मंत्रालयात विविध खात्याचे मंत्री व मंत्रालय प्रशासनातील अधिकारी यांच्याशी सतत चा पाठपुरावा व समन्वय ठेवून, गावचा तसेच पंचक्रोशीतील गावांचा विकास कसा केला जातो, याचं उदाहरण म्हणून जनता वसंत सुगावे यांच्याकडे पाहत असते

विकासकामांची तळमळ असलेला माणूस म्हणून वसंत सुगावे यांची जिल्ह्यात ख्याती आहे..वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून सतत वेगवेगळ्या प्रकारचा निधी मंजूर करून घेऊन ते गावचा व परिसराचा विकास करत असतात..अशातच त्यांनी गावच्या विकासात आणखी एक भरघोस निधीस मंजूरी मिळवून दिली आहे..
        
वसंत सुगावे पाटील यांच्या प्रयत्नातून घुंगराळा येथे २ कोटी ०५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला ह्या निधीमध्ये पर्यटन तिर्थक्षेत्र योजने अंतर्गत घुंगराळा येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदिराच्या सभामंडपासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा .खा. सुनीलजी तटकरे यांच्या शिफारशी वरून पर्यटन मंत्री मा .ना. गिरीश महाजन यांच्या कडून सुगावे यांनी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे

व त्या अगोदर तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री मा. ना. कु. अदितीताई तटकरे यांच्या कडून ५० लक्ष रुपये व दिं १५ मार्च रोजी निघालेल्या पर्यटन विभागाच्या शासन निर्णय आदेशानुसार ५० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे

असे एकूण दीड कोटी रुपये सभागृह बांधकामास मंजूर करून घेतले यामुळे गावात भव्य दिव्य सभागृह होणार आहे.रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री मा.ना. संदीपान भुमरे कडून गावातील खंडोबा मंदिर परिसर व हनुमान मंदिर परिसर येथे पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समिती अंतर्गत गावातील दोन अंगणवाडी साठी २२.५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे..

तसेच घुंगराळा येथे नायगाव पंचायत समिती व जिल्हा परिषद नांदेड यांच्या माध्यमातून नांदेड हैद्राबाद मुख्य रस्त्यावर घुंगराळा पंचक्रोशीतील पुरुष व महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालया करिता ३ लक्ष ३० हजार रुपये मंजूर केला तसेच गावातील ओबीसी प्रवर्गातील पात्र ३६ घरकुल लाभार्थ्यांपैकी २२ लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेतून २२ घरकुल मंजूर करण्यात आले आहेत 
         
अशा प्रकारे एकूण २ कोटी ०५ लक्ष रूपयांचा निधी घुंगराळा गावासाठी मंजूर करून घेतला असून अशाच प्रकारे पूर्वीच्या काळात ही कोटींचा निधी गावासाठी खेचून आणला असून पुढे देखील अशाच पद्धतीने गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच भविष्यात पंचक्रोशीतील विविध गावांच्या विकास कामांसाठी कटिबद्ध राहिल अशी प्रतिक्रिया वसंत सुगावे पाटील यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments