नायगाव तहसील प्रशासनाचा कारभार टकाटक चालवण्यासाठी नूतन महिला तहसिलदार धम्म प्रिया ताई गायकवाड यांनी मोठे प्रयत्न करणार असून तहसील प्रशासनाच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी त्याच बरोबर महिला वर्ग यांना शासनाच्या योजना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूत्रां कडून कळते आहे
जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालयाचा पदभार नुकताच नूतन महिला तहसीलदार धम्म प्रियाताई गायकवाड यांनी स्वीकारला असल्यामुळे तालुक्यातील ८९ गावातील गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत
यात संजय गांधी निराधार योजना असो की श्रावण बाळ योजना असो अपंगासाठी पात्र लाभार्थ्यांना शासना कडून मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत
शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनाच्या अंतर्गत येणारा २००० हाजार रुपयाचा हप्ता खात्यात मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याने शेतकऱ्यांना आता कोणत्या ही अडचणीचा सामना करावा लागणार नसल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले आहे
सदरच्या तहसील कार्यालयासाठी तत्कालीन महिला तहसीलदार सुरेखाताई नांदे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे तहसील प्रशासन सांभाळले होते त्या पाठोपाठ याच तहसील कार्यालयासाठी महिला तहसिलदार म्हणून मंजुषाताई भगत यांनी अतिशय योग्य रीतीने सदरचे महसूल प्रशासन चालविले आहे
सन २०२४ मध्ये नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार म्हणून परत एकदा धम्म प्रियाताई गायकवाड यांनी पदभार स्वीकारला यांनी सुद्धा गोरगरीब जनतेसाठी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत
तहसील प्रशासनाकडे जर शासकीय लाभ घेण्यासाठीच्या फायली जर प्रलंबित असतील तर ते सुद्धा लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत

0 Comments