कोष्टेवाडी गावातील संत बाळूमामा पालखी निमित्ताने झालेल्या महाप्रसादामध्ये भगर आणि कढी खाल्ल्यामुळे हजारो भक्तांना विषबाधा झाली रुग्णांना संडास उलटी चक्कर थरथरी येत असल्याने रात्री दोन वाजता पळापळ सुरू झाली मिळेल त्या वाहनाने रुग्ण लोहा येथील शासकीय रुग्णालयात येऊ लागले आहे
पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना माहिती समजतात त्यांनी संपूर्ण यंत्रणाच जागी केली, त्यांनी प्रथम सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर यांना संपर्क करून गांभीर्य समजून सांगून तात्काळ ड्युटीवर येण्यास सांगितले, शहरातील सर्व खाजगी डॉक्टर यांना आपले हॉस्पिटल उघडून तयार रहान्यास सांगितले.
रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा गोंधळ उडत होता डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांना विविध ठिकाणी शिफ्ट केले.
बंद असलेले वार्ड उघडे करून स्वतः पोलिसांनी खाटा साफसफाई केल्या त्यावर गाद्या आंतरल्या सलाईन लावण्याचे साहित्य रॉड सर्व साहित्य पोलिसांनी फिट केले आणि त्या ठिकाणी अजून आलेले रुग्ण शिफ्ट केले.
सर्वात महत्वाचे म्हणजे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामध्ये उद्भवणारा वाद पोलिसांनी होऊच दिला नाही प्रत्येक पेशंट सोबत एकच नातेवाईक सोडून बाकी सर्वांना सक्तीने बाहेर थांबवण्यात आले त्यामुळे गोंधळ माजला नाही डॉक्टर आणि नर्सेस कमी असल्याने आणि रुग्ण जास्त असल्यामुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणात सलाईन द्यावे लागले त्यामध्ये अनेक सलाईन स्लो होणे फास्ट होणे बंद पडणे आऊट होणे असे काही प्रकार झाले आहे
त्यामुळे प्रत्येक वार्ड मध्ये एक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सलाईन सुस्थितीमध्ये आहे का नाही एवढे पाहण्यासाठीच नेमणूक करण्यात आली चुका दिसून आल्यास पोलीस लगेच नर्स डॉक्टर यांना संपर्क करून त्या ठिकाणी आणत होते.
पोलीस हे प्रत्येक रुग्णांना त्रास, अतिशय त्रास होत असेल तर अशा रुग्णांना आयडेंटिफाय करून त्यांना विचारपूस करून लगेच नांदेड येथे पाठवण्या कामी बाहेर काढले जात होते यासाठी विशेष पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती.
बाधित गावांमध्ये वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे त्या गावांमध्ये पोलिसांनी संपर्क करून ट्रॅव्हल्स बोलेरो पिकप इतर खाजगी वाहने तत्काळ पाठविली त्या गावातून पेशंट आणून लोहा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले.
लोहा शासकीय रुग्णालयाची कॅपॅसिटी संपल्यानंतर एसटी महामंडळाच्या बसेस खाजगी ट्रॅव्हल्स कार मालवाहू वाहने त्यांच्या संघटना यांना संपर्क करून पोलिसांनी वाहने मागवून घेतली आलेल्या वाहनांमध्ये रुग्णांना शिफ्ट करून त्यांना टप्प्याटप्प्याने विष्णुपुरी हॉस्पिटल येथे पोहोचविण्यात आले.
विष्णुपुरी हॉस्पिटल येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण झाल्याची माहिती पोहोचल्यामुळे सदर रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी काही वाहने पोलिसांनी अहमदपूर पालम कंधार येथील शासकीय रुग्णालयाकडे रवाना केली.
तसेच बेरळी फाट्यावर एक पोलिसांची विशेष टीम नेमून आलेली काही वाहने परस्पर खाजगी दवाखाना लोहा येथे पाठविण्यात आली.
पोलिसांचे एक पथक फक्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना विचारपूस करणे आणि आत्मविश्वास वाढवणे यासाठीच नेमण्यात आले होते.
यावेळी पोलिसांनी लोहा येथील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते संघटना यांच्याशी संपर्क करून त्यांना मदतीसाठी बोलाविले सदर व्यक्ती आणि संघटना यांनी अतिशय आपुलकीने आणि जबाबदारीने प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून काम केले.
माळाकोळी पोलीस स्टेशनचे संजय डी निलपत्रेवार आणि त्यांची टीम यांनी कोष्टेवाडी सावरगाव व इतर आजूबाजूच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्यांना कुणाला लक्षणे आहेत अशांचा शोध घेऊन यांना वाहनांमध्ये बसवून रुग्णालयाकडे रवाना केले
रात्रीच्या अंधारामध्ये पोलिसांचा एकमेकांशी असलेला ताळमेळ आणि होत असलेले नियोजन लोकांनी प्रत्यक्षात अनुभवले.
सदर घटना ही फार गंभीर असून वेळेत रुग्णांना वाहने रुग्णालय व उपचार मिळाले नसते तर जीवित आणि किंवा जबर हानी होण्याची शक्यता होती सदर घटने संबंधाने वैद्यकीय व्यवस्था महसूल व्यवस्था यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले.
रुग्णालय, महसूल प्रशासन, रुग्ण, नातेवाईक, वाहने, चालक, लोहा अहमदपूर पालम कंधार विष्णुपुरी रुग्णालय,राजकीय सामाजिक कार्यकर्ते नेते या सर्वांना एका संपर्कात ठेवून सर्वांचा व्यवस्थित ताळमेळ बसवून घडलेली मोठी घटना ही पोलिसांच्या योग्ये मॅनेजमेंट मुळेच अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आली आहे
सर्वच स्तरामधून लोहा पोलिसांच्या कामाची स्तुती होत असताना दिसून येते.

0 Comments