Header Ads Widget

नायगाव तहसील प्रशासनाचा कारभार अतिशय उत्कृष्टपणे चालवणाऱ्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांची लातूर जिल्ह्यात बदली - पदभार स्वीकारला !!

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तहसील प्रशासनाचा अतिशय उत्कृष्टपणे कारभार सांभाळणाऱ्या एकमेव महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांची लातूर जिल्ह्यातील रेणापुर तहसील कार्यालयात दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी बदली करण्यात आली आहे

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील सदरच्या तहसील प्रशासनाचा पदभार त्यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी पदभार स्वीकारला असून सदरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आल्या असल्या तरी ७ महिने नायगाव तहसील प्रशासनाचा कारभार योग्य पद्धतीने सांभाळला आहे

नांदेड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर ह्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असल्यामुळे नायगावच्या तत्कालीन महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ दिल्याचे समजते आहे 

जिल्ह्यातील नायगाव तालुका हा ८९ ते ९० गावाचं कार्यक्षेत्र असलेला तालुका असल्याने तत्कालीन तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी गेल्या अतिवृष्टीच्या कार्यकाळात तहसील प्रशासन संगतीला घेऊन स्वतः पुर परिस्थितीची पाहणी केली आहे

मागील २०२३ रोजीच्या जुलै ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीने पूर् आले होते जन सामान्य शेतकऱ्याचे  शेतातील पिके अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेश देऊन पंचनामे तात्काळ करून घेतली आहेत





Post a Comment

0 Comments