हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती २०२४ च्या वतीने आज दि १९फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती निमित्त श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समोर प्रतिमेचे पूजन करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन उपस्थित होते
नवतरुण युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे समोर अभिवादन करून उपस्थित सर्व गावकऱ्यांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या......
या बाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीकडून दिनांक १९फेब्रुवारी रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिनांक २२फेब्रुवारी रोजी
शहरात शिवजन्म सोहळा निमित्त भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत त्यामुळे आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे शहरात आगमन झाल्यामुळे त्या मूर्तीचा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता
या आगमन सोहळ्याचे विशेष आकर्षण गंगाई कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक तयार करून मूर्तीचे स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधन छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते
या रक्तदान शिबिराला हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन उपस्थित युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले यावेळी गुरुगोविंद सिंग ब्लड बँक
नांदेड ने हिमायतनगर येथील शिबिराचे रक्त संकलन केले या प्रसंगी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे ,काँग्रेस तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, आशिष भाऊ सकवान, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष गजानन चायल,माजी नगराध्यक्ष
अब्दुल अखिल , माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ सुर्यवंशी, सुभाष मामा शिंदे, विलास वानखेडे,संजय माने,गजानन हरडपकर,सह सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments