Header Ads Widget

सवना येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था बोर्डाचे अनावर हिमायतनगर तालुकास्थरीय शाखा पदाधिकारी नियुक्ती भजनी दिंडी नामघोषेत गाव सवना गाव दणानले.

हिमायतनगर : नागोराव शिंदे  - 

हिमायतनगर तालुक्यातील सवना  येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा बोर्डाचे अनावरण तालुकास्थरीय शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा भजन दिंडी ने नामघोष  दि.१८ फेब्रुवारी.२०२४ रोजी सकाळि १०वाजल्या  पासुन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सवना गावांमध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष ह भ प  गुरूवर्य राम महाराज पांगरेकर , यांच्या सह प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर हंबर्डे,सचिव -व्यंकटराव  जाधव  सहसचिव प्रभाकरराव पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड,जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल, हिमायतनगर तालुक्यातील  भाविक भक्त नागरिक,इत्यादी मान्यवर,  भक्त गणांच्या  ऊपस्थित बोर्डाचे अनावरन करून , नियुक्ती पत्र वितरण सोहळ्याचे मोठ्या ऊत्साहात  वाटत करण्यात आले.
     प्रथम दिप प्रज्वलन करुन सत्संगाचा आर्शिवाद घेऊन मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
प्रास्ताविक संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी आम्हि वारकरी परिवाराच्या शाखा का स्थापन करण्यात आली व संस्थेच्या कार्याबदल माहिती दिली 
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात सचिव व्यंकटराव जाधव, शिवाजीराव पांगरगेकर, प्रविण रौतुलवाड,भगवान राहाटिकर,बालाजी पवार, प्रभाकर पा.पवळे, सोपान पा गिरे,देशोन्नतीने पत्रकार प्रमेश्वर गोपतवाड,ईत्यादीने आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प राम महाराज पांगरेकर यांनी आम्हि वारकरी परिवाराने सहा वर्षापापुर्वी फक्त ४२ व्यक्तीने ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण चालु करून आज सहा वर्षांत सहा हजार पाचशे,ग्रंथ घऱोघरी पारायण घर तिथे ज्ञानेश्वरी संस्थेकडून मोफत देऊन धार्मिक भावनेची वाढ निर्माण करून जिल्ह्यातील सोहळाही तालुक्यातील कार्यकार्णी करुन गाव तिथे शाखा स्थापन करुन दुषित वातावरण शुध्दीकरण करणे,व्यसनापासून तरून पिढीला सद्गुण प्राप्त व्हावे धर्माचे रक्षण करण्यासाठि अनेक  आघाडी पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. 
 त्यात हिमायतनगर तालुका  पत्रकारांसाठी तालुका प्रसिध्दि अध्यक्ष म्हणून सोपान लक्ष्मणराव बोंपीलवाड,
 उपाध्यक्ष अनिल रेणुकादास  भोरे,

हिमायतनगर तालुकासचिव म्हणून नागोराव संभाजी शिंदे पळसपुरकर,सहसचिव परमेश्वर गोपलवाड,कोषअध्यक्ष गंगाधर गायकवाड दिघि कर,प्रसिध्दी मार्गदर्शक विजय वाठोरे सरसम, अशा प्रकारे तालुक्यातील आठाविस शाखा नियुक्तीपत्र ,
       सर्व आघाडीतील कार्यकारणी व शाखा कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आम्हि वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान आयोजित केले होते.
 हिमायतनगर तालुक्यातील 
     सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, साधुसंत,भाविक भक्त मंडळी उपस्थिती राहुन हा कार्यक्रम यशस्वि केला.
 आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे तालुकाअध्यक्ष नागोराव मेंडेवाड,विनोद निलमवाड,राजेश आलेवाड, बंडु अनगुलवाड,विलास राहुलवाड,संदिप गोपेवाड, तुकाराम निलेवाड पदाधिकारी, सवना येथील नागरिकानी मोठ्या प्रमाणात  परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वि केला असे प्रसिध्दि पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी  नायगाव फास्ट न्यूज ला दिले आहे.

Post a Comment

0 Comments