हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यामध्ये काल दिनांक११ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर तहसीलचे निवासी तहसीलदार हराळे यांनी पाहणी केली आहे
हिमायतनगर सज्याचे मंडळ अधिकारी चव्हाण ,पळसपुर सज्याचे तलाठी बडेवाड , कोतवाल अनिल तालेवार यांनी आज हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर डोलारी शिरपली शेलोडा एकांबा आदी भागांमध्ये शेतामध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे
संबंधित नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू असे निवासी तहसीलदार हराळे यांनी सांगितले आहे
यावेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर प्रकाश वानखेडे, पळसपुरते तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील वानखेडे, सरपंच मारोती वाडेकर, कृषी मित्र कल्याण वानखेडे कृषी सहाय्यक कोठुलवार यांच्यासह शेतकरी माधवराव देवसरकर, बाबुरावजी वानखेडे ,आनंदराव जाधव, अनिल गायकवाड, बंडू शिंदे, सजेन वानखेडे राजु वानखेडे, साईनाथ जाधव, आदी शेतकरी उपस्थित होते

0 Comments