Header Ads Widget

प्रजासत्ताक दिनी होणारा वाढदिवस जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत साजरा करणार नाही - माधवराव पाटील जवळगावकर !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे -

काँग्रेस पक्षाचे हदगांव हिमायतनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा वाढदिवस दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवसी होणारा वाढदिवस हा जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही असे आवाहन हदगाव हिमायतनगर तालुक्यातील माय बाप मतदार बांधवांना केले आहे

प्रजासत्ताक दिनी होणारा वाढदिवस जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत साजरा करणार नाही - माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हदगाव हिमायतनगर मतदार संघातील तमाम मतदार बांधवांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे घेऊन अथवा घालू नये असे आवाहन केले आहे 

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लाखोच्या संख्येने मराठा बांधव घेऊन मुंबईच्या दिशेने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले आहेत त्यामुळे मी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांच्या सोबत असल्यामुळे माझा प्रजासत्ताक दिनी होणारा वाढदिवस रद्द करून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे आमच्या नायगाव फास्ट न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांनी गेल्या सात ते आठ महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून संघर्ष करीत आहेत त्यांच्या संघर्षाला येस संपादन होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील मायबाप जनतेनी व मतदार बांधवांनी प्रजासत्ताक दिनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्या ही बांधवांनी हार तुरे घेऊन येऊ नये अथवा घालू नये अशी मी तमाम मतदार बांधवांना विनंती करीत आहे 



Post a Comment

0 Comments