Header Ads Widget

मार्कंडच्या पोलीस पाटील पदी नूतन महिला सौ.अलका बोकारे - अभिनंदन !!

        माधव पवार 
मार्कंड (ता.जि.नांदेड) गावच्या नूतन पोलीस पाटील पदी सौ.अलका बालाजी बोकारे यांची नियुक्ती झाली असून,नुकत्याच घेण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाच्या रिक्त असलेल्या जागेवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मार्कंड येथील रिक्त जागेवर खुल्या प्रवर्गातून अर्ज मागविण्यांत आले होते. यात अर्जाच्या पात्रतेनुसार घेण्यांत आलेल्या लेखी आणि तोंडी परीक्षेच्या अनुषंगाने प्रांत अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत

माँ जिजाऊ साहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्या महिला बनत असल्यामुळे आज घडीला पुरुषा बरोबर  राजकीय क्षेत्र असो की शिक्षण क्षेत्रामध्ये अथवा गावातील  सरपंच पदावर महिला विराजमान होत असल्यामुळे त्यांच्या भावी कार्यासाठी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा  : माधव पवार : रुई कर यांच्या वतीने देण्यात येत आहे 

अंतिम गुणवत्तानुसार सौ.अलका बालाजी बोकारे यांनी सर्वोच्च गुण मिळवल्याने त्यांची पोलीस पाटील पदासांठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments