Header Ads Widget

खैरगावच्या विद्यमान महिला पोलीस पाटील पदी सौ अस्मिता गजानन जाधव यांची निवड !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे खैरगाव येथील रहिवासी असलेल्या सौ अस्मिताताई गजानन जाधव यांनी पोलीस पाटील भरतीच्या माध्यमातून गावच्या विद्यमान महिला पोलीस पाटील पदी विराजमान झाले असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व  अभिनंदन करण्यात येत आहेहिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी राजे यांच्या मातोश्री माँ जिजाऊ साहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची पेरणी महिला वर्गात मोठ्या प्रमाणात झाली आहे

खैरगाव येथील रहिवासी असलेले रामराव पिराजी जाधव यांची सून व गजानन रामराव जाधव यांचा पत्नी सौ अस्मिता गजानन जाधव यांची खैरगाव येथील पोलिस पाटील पदी निवड झाल्या बद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांनी भारतीय राज्य घटनेत महिला चांगल्या प्रकारे स्थान दिले असल्यामुळे विविध पदावर राजकीय क्षेत्र बरोबर शिक्षण क्षेत्र असो की गावातील सरपंच पद असो त्या पदावर महिला पदावर विराजमान होत आहेत

माँ जिजाऊ साहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराच्या माध्यमातून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत त्या शिक्षणाचा फायदा महिलांना होत असल्याने या क्रांतिकारी मातोश्रीचा आदर्श घेऊन विविध पदावर विराजमान होत असल्यामुळे त्यांच्या भावी कार्यासाठी नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत 



Post a Comment

0 Comments