Header Ads Widget

तीन दिवसात काम सुरू करा ऊप अभियंता आणि गुत्तेदार यांना आमदारानी धरले धारेवर

हिमायतनगर .. नागोराव शिंदे 

 हिमायतनगर पळसपुर डोल्हारी सीरपली हा१२  की मी.रस्ता प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे कामाला मंजुरी मिळाली आणि या कामासाठी ७कोटी३०लक्ष रुपये मंजूर झाले 
असल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात  खासदार हेमंत पाटील आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली आहे 

स्त्याचे काम सुरू असताना गुत्तेदार आणि शासकीय कर्मचारी यांनी कामात दिरंगाई केल्याने रस्त्याचे एक वर्षापासून काम रखडले हे काम सुरू करण्यासाठी पळसपुर डोल्हारी सीरपली या गावच्या ग्रामस्थांनी आज डोल्हारी येथे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत रस्त्याचे बंद असलेले काम सुरू करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी व गुत्तेदार यांची तातडीने बैठक घेतली आहे

यावेळी ऊप अभियंता बी डी शिंदे , कनिष्ठ अभियंता कानीदे , गुत्तेदार सीद्धीकी ,व संबंधित विभागाचे अधिकारी आणि गुत्तेदार यांचे कर्मचारी हजर होते
 या कामाच्या अडचणी समजून घेऊन आ.माधवराव पाटील यांनी धारेवर धरून पावसाळ्यापूर्वी काम करण्याची तंबी देऊन कामात दिरंगाई केल्यास आपणावर कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी सांगितले आहे

तीनही गावातील ग्रामस्था समोर गुत्तेदारा कडून उप अभियंता शिंदे यांनी तीन दिवसांत काम सुरू करण्यात येईल व दर्जेदार काम करण्याचे यावेळी सांगितले

 हिमायतनगर पळसपुर डोल्हारी गांजेगाव ढाणकी मार्ग गांजेगाव येथे पैनगंगा नदी वर पुल करून माहुर फुलसांगी ढाणकी गांजेगाव हिमायतनगर भैसा महामार्ग करण्यासाठी आ.माधवराव पा. जवळगावकर यांनी आपण प्रयत्नशील असल्याचे असे सांगितले

 यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रमेश कदम  डोल्हारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तीन गावाचे नागरीक, ढाणकी येथील शेख इरफान, हिरासींग ठाकुर, डाॅ.  प्रकाश वानखेडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर,माजी सरपंच किसनराव वानखेडे, माजी सभापती वामनराव वानखेडे, सरपंच मारती वाडेकर, वसंत पा

तं.मु.अध्यक्ष पळसपुर,मदनराव पाटील, शिवाजी पाटील, अवधूतराव पा.सीरपली,चांदराव वानखेडे माजी चेअरमन पळसपुर, दिगंबर दुकानदार,दत्ता बोंबीलवार, संदिप कदम, मधुकर वाडेकर,रफीक शेठ, जनार्दन ताडेवाड, सोपान  बोंपीलवार ,नागोराव शिंदे पत्रकार , अनगुलवार सर   समस्त डोल्हारी येथील नागरीक  मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments