Header Ads Widget

प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत जिल्हाधिकारी नांदेड कार्यालया कडून जमिनीचा मावेजा देण्यास विलंब ? असल्याचा आरोप !!

         माधव पवार 
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या अंतिम वर्क आऊट मध्ये जिल्हा प्रशासनाने खाजगी वाटा घाटी अंतर्गत तलबिड  येथील २ शेतकऱ्यांची १ एकर जमीन जलयुक्त शिवार प्रकल्पासाठी संपादित केली आहे

सदरील काम पुर्ण होऊन १ वर्ष उलटून गेली मात्र अजून ही त्या बदल्यात येथील शेतकऱ्यांना कोणता ही मोबदला दिला गेला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय बिलोली जलसंधारण विभाग नांदेड येथे पत्रव्यवहार केला आहे

तरी ही न्याय मिळाला नाही शासकीय अधिकारी कर्मचारी आपले हात वर करत माहिती गोळा करून देतो असे सांगत वेळ काढू पणाचे धोरण अवलंबत आहेत असा आरोप करण्यात आला आहे

दोन दिवसात संपूर्ण जमिनीचा मावेजा मिळाला नाही तर येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आत्मदहन  करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते आहे 

Post a Comment

0 Comments