Header Ads Widget

२००० हजार रुपयाची फाईन भरा म्हणाऱ्या तोतया पोलिसांना दैनिक प्रजावाणीचे नाव दिसताच फुटला घाम

               माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी समस्त गावकऱ्यांच्या वतीने खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचा डाव आयोजित करण्यात आला होता सदरची यात्रा पाहण्यासाठी व कुस्त्या पाहण्यासाठी अनेक गावातून नागरिक आले असल्यामुळे घुंगराळा येथे माळेगाव यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते

तालुक्यातील घुंगराळा ही खंडोबा रायाची यात्रा भव्य स्वरूपाची भरली जाते या यात्रे मध्ये हौसे नवसे गौसे हे दर वर्षी येत असतात परंतु यंदा काही एक दोन तोतया पोलिसांची इंट्री झाली बाहेर गावाहून जत्रा पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी मोटार सायकली नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर लावले असताना तोतया पोलिसांनी मोटार सायकलच्या चावी काढून घेऊन २००० हाजार रुपयाची फाईन भरण्यासाठी तगादा लावला आहे

या घुंगराळा येथील यात्रेत अंगावर खाकी वर्दी नसताना सुद्धा मोटार सायकलच्या जवळ जाऊन फाईन भरा असे सांगण्यात येत होते खरे परंतु एका मोटार सायकलवर दैनिक प्रजावाणीचे नाव होते त्या तोतया पोलिसांना दिसताच चांगलाच घाम फुटला असल्याचे ऑनलाईन व्रत आहे

Post a Comment

0 Comments