Header Ads Widget

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर गाव तिथे बसस्टॅन्ड राहण्या ऐवजी गाव तिथे बस स्टॅन्ड नाही ? म्हण्याची वेळ !!

          माधव पवार 
सार्वजनिक बांधकाम विभागासह काहाळा कल्याण टोल नाक्याच्या बेजबाबदारपणामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर गाव तेथे बस स्टैंड बांधण्याऐवजी गाव तेथे बस स्टॅन्ड नाही अशी वेळ या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशातून बोलल्या जात असून कृष्णुर व घुंगराळा कहाळा या ठिकाणी तर प्रवाशांना थांबण्यासाठी परवासी निवारा देखील नसल्याचे स्पष्ट चित्र या सदरच्या मार्गावर दिसून येत आहे

नांदेड ते हैद्राबाद राज्य मार्ग हा सर्वात मार्ग मोठा असल्यामुळे व याच मार्गावरून आंध्रप्रदेश कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू या राज्याला जोडलेल्या रस्त्यावर प्रवाशांची सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्दळ असते परंतु अश्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागासह काहाळा टोल नाका या यंत्रणेच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे काही तुरळक ठिकाणी प्रवासी निवारा उभारण्यात आला आहे

नायगाव तालुक्यातील घुंगराळा कृष्णुर काहाळा या ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी निवारा नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

काहाळा टोल नाका उभारण्याच्या पूर्वी या मार्गावर जागोजागी बस स्टॅन्ड अर्थात कॅन्टीन होती परंतु त्या कॅन्टीनचा काहीच फायदा उरला नाही काहाळा कल्याण टोल नाक्यावर दैनंदिन लाखो रुपयाची उलाढाल होत असताना सुद्धा कहाळा टोल नाका प्रशासनाने घुंगराळा  व कृष्णुर बस स्टॅन्ड तात्काळ बांधून येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी जनसामान्य माणसातून करण्यात येत आहे 



Post a Comment

0 Comments