माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु नगरीच्या विकास कामासाठी नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी कायम स्वरूपी ग्रामसेवक द्यावेत कारण सरपंच व ग्रामसेवकात ताळमेळ लागत नसल्यामुळे या गावचा ग्रामसेवक कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे
तालुक्यातील रुई बु येथे विकास कामाचा पायंडा पुढे नेण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकात समन्वय असायाला पाहिजे होता परंतु काही तांत्रिक आडचणीमुळे सरपंच व ग्रामसेवकात ताळमेळ लागत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एल आर वाजे यांच्याकडे ग्रामसेवकाच्या बदली संदर्भात मागणी करण्यात आली असल्याची व ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी यांची बदली झाल्याची चर्चा करण्यात येत असली तरी रुई बु येथे ग्रामसेवक कोणत्या ग्रामशेवकाची नेमणूक करण्यात आली हा महत्वाचा प्रश्न आहे
पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एल आर वाजे यांनी रुई बु येथे तात्काळ कायम स्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करून गावच्या विकासासाठी चालणा द्यावी हा मुळ हेतू असला तरी सरपंच ग्रामसेवकात ताळमेळ लागत नसल्याने विकासाला खीळ बसत असल्याचे ? वास्तव चित्र दिसून येत आहे

0 Comments