हिमायतनगर. :- नागोराव शिंदे पळसपुरकर
जाणीवपूर्वक चुकीचा फेरफार केला अशा तलाठ्याचा भरचौकात सत्कार करावा असे वाटते अशी प्रतिक्रिया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नी श्रीमती ज्योत्सना परमेश्वर जाधव दिली केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्रीमती ज्योत्स्ना परमेश्वर जाधव यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर येथील सज्जाचे तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर व तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी जाणीवपूर्वक आमच्या हिमायतनगर येथील शेत सर्वे न. ४१७/२ व ४१७/३ मधील जमीन बेकायदेशीर रित्या कोणत्याही कायद्याची पर्वा न करता हिमायतनगर येथील शेख इम्रान शेख अन्वर व मिर्झा जुनेद बेग अमीर बेग यांच्या नावावर करून दिली होती त्यामळे माझ्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे
तलाठी व मंडळ अधिकारी यांनी बेकायदेशीर रित्या नोंदविलेले फेरफार उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी दि. २८ नोव्हेंबर २०२३ ला रद्द ठरविले आहेत. परंतू माझ्या पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कोणती ही कारवाई केलेली नाही
एकीकडे शेतकऱ्याच्या आत्महत्या होवू नये म्हणून शासन अटोकाट प्रयत्न करते आणी दुसरीकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीच पाहीजे अशी व्यवस्था आपलं प्रशासन निर्माण करतं, माझ्या कपाळावरच सौभाग्याचं कुंकू पुसून आमची पोरं पोरकी झाली , तरी सत्यमेव जयते म्हणणारे आपले काही कर्तव्य परायण अधिकारी अश्या तलाठ्याला आणी मंडळ अधिकाऱ्याला पाठीशी घालून प्रोत्साहन देतात
हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण आहे की काय?
म्हणून साहेब आपल्या अधिकाऱ्याने माझ्या नवर्याला आत्महत्येस प्रवृत्त करून माझ्या कपाळावरच कुंकू पुसलय आणी माझ घर उघड्यावर आणलय, त्याच्या या अमूल्य योगदानाबद्दल माझी आणी माझ्या पोरक्या झालेल्या मुलाची इच्छा आहे
की, भर चौकात बॅडबाजा लावून आपल्या तलाठ्याचा भव्य सत्कार करावा, आणी वरीष्ठ अधिकारी म्हणून आपणही उपस्थित राहिलात तर आनंदच होईल, साहेब आपल्या कर्तव्यदक्ष, इमानदार अधिकाऱ्याच्या सत्कर्मामुळे विधवा झालेल्या या अनाथ मुलाच्या आईची विनंती.
असा आर्त टाहो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी श्रीमती ज्योत्स्ना परमेश्वर जाधव यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना उपरोक्त निवेदन सादर करून फोडला आहे.

0 Comments