हिमायतनगर नागोराव शिंदे -
सदरील माहितीच्या आधारे आपण नांदेड जिल्ह्यातील एक टीम उमरखेड येथे पाठवली होती परंतु संबंधित तस्करांना संशय आल्यामुळे त्यांनी भरलेला ट्रक एक दिवस लपवून ठेवला होता. परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी हार न मानता सदरील ट्रकचा पाठपुरावा गुप्तपणे चालू ठेवला आणि दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी सदरील ट्रक क्रमांक आसना ओवर ब्रिज जवळ पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला.
सदरली प्रकरणांमध्ये विमानतळ पोलिस स्टेशन येथे काल उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. मागील एक वर्षभरापासून नांदेड शहरासह जिल्ह्यात हजारो गोवंशाची कत्तल नियमितपणे सुरू आहे
आम्ही मागच्या एक वर्षभरापासून पोलीस प्रशासनाला नियमित गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांची यादी,
तसेच ज्या वाहनांवर यापूर्वी देखील दोन दोन तीन तीन चार चार गुन्हे दाखल आहेत, अशी एक यादी सुद्धा दिली होती. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कसायांप्रती असलेल्या सहानुभूती पोटी सदरील वाहन मागच्या एक वर्षापासून पोलिसांना सापडू शकले नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते सर्व वाहन दररोज पोलिसांच्या मदतीने गोवंशाची कतली साठी वाहतूक करत आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राज्यस्तरीय वंशाची तेलंगणा राज्यांमध्ये तस्करी करणारी टोळी तसेच स्थानिक कसाई यांचे संगणमत असल्याचे मागच्या काही प्रकरणावरून दिसून आले आहे,
आणि तसेच आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली माहिती कसायांना पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील रीतसर तक्रार केल्यावर सुद्धा वरिष्ठांनी पाठीशी घालने हे अतिशय चिंताजनक आहे. पोलीस प्रशासनाच्या लालसी वृत्तीमुळे आमच्या गोरक्षक कार्यकर्त्यांच्या जिवीत्वास धोका निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही या सर्व बाबींचा विचार करून दिनांक ४ डिसेंबर रोजी मा. गृहमंत्री
महाराष्ट्र राज्य, मा. अध्यक्ष महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य, मा. अध्यक्ष, गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य, मा. चेअरमन पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण महाराष्ट्र राज्य आणि मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे नाविलाजास्तव तक्रार केली आहे. या कारवाईत सहभागी सर्व पोलीस अधिकारी व गोरक्षक कार्यकर्त्यां चे बिचेवार यांनी केले

0 Comments