शासनाने जुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांना तूटपंजी आर्थिक मदत केली असली तरी यादीत नाव आले आणि यादीत रक्कम ही आली परंतु थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्या ऐवजी शासनाने शेतकऱ्याच्या समोर केवायसीचा दांडू टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सदरची रक्कम जमा होत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून अनेकांनी अर्ज बाजारी केल्याच्या नंतर शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली असली तरी सध्याच्या परिस्थिती मध्ये ऑनलाईनचा बोबांटा आणि शेतकऱ्यांचे व वयोवृद्ध व्यक्तींचे बऱ्याच पैकी प्रमाणात अंगठे येत नसल्याने सदरच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पडत नसल्याचे चर्चा होताना ऐकू येत आहे
शासन प्रत्येक वेळी व दरवर्षी केवायसी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक कातर बसत असून सदरची केवायसी करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशाला कातर लावणे होय असा प्रश्न वेळोवेळी शेतकऱ्याला पडत असला तरी शासनाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडण्या ऐवजी आता केवायसी केल्या शिवाय पडत नाही अशा पद्धतीची शासन केवायसी करून घेऊन शेतकऱ्या कडून पैसा शासनाच्या तिजोरीत जमा करीत आहे
शासनानी केवायसी बंद करून शासना कडून आलेले अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी कारण बऱ्याच पैकी शेतकऱ्याचे अंगठ्याचे ठसे येत नसल्याने शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी दररोज नायगाव उमरी घुंगराळा धर्माबाद अशा ठिकाणी जावे लागत असले तरी अनेक ठिकाणची ऑनलाईन बंद अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांना परत घरी पायी यावे लागत आहे

0 Comments