Header Ads Widget

घुंगराळा येथे श्री म्हाळसाकांत यात्रासाठी गावकऱ्याची जोरदार तयारी - कुस्त्या रंगणार मंगळवारी - बालाजी मातावाड !!

.       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मोजे घुंगराळा येथील श्री तीर्थक्षेत्र असलेल्या श्री म्हाळसाकांत यात्रेसाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत असून सदरच्या यात्रेनिमित्त दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोज मंगळवार या दिवशी जंगी कुस्त्याचा डाव रंगनार आहे
या यात्रेसाठी व्यापारी यात्रे करू पैलवान मंडळी उपस्थित राहावे असे आवाहन बालाजी  मातावाड यांनी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून केले आहे

जिल्ह्यातील व नायगाव तालुक्यातील घुंगराळा हे गाव नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे या गावांत श्री म्हाळसाकांत खंडोबा रायाची यात्रा ही दरवर्षी भरते माळेगाव यात्रे नंतर दुसऱ्या क्रमांकावर भरणाऱ्या यात्रेसाठी कुस्त्या खेळण्यासाठी राज्यातून व बाहेर राज्यातुन पैलवान मंडळी येतात

या गावांत विजेता पैलवानासाठी मोठे बक्षीसाचे वितरण केल्या जाते असे ही नायागांव पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी तथा गावच्या माजी सरपंच प्रतिनिधी बालाजी मातावाड यांनी सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments