Header Ads Widget

दळभद्री सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचा अंगठा येत नसल्यामुळे केवायसीचा फटका बँकेत अनुदान जमा होईना शेकडो शेतकरी वंचित !!

          माधव पवार
शेतकरी राजाच सरकार म्हणणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे वाटोळे होत ?  असल्यामुळे गेल्या अतिवृष्टीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या शेतातील मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि प्रशासनानी शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे ही करण्यासाठी आदेशित केले होते

तलाठी व मंडळाधिकारी यांच्या मार्फत पंचनामे झाल्याच्या नंतर शासना कडून तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली असली तरी त्या शेतकऱ्यांना त्या अनुदानाचा कसल्याच प्रकारचा फायदा होत नसल्याने शेतकरी राजा चिंतेत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

प्रशासनाने शेतकऱ्या समोर केवायसीचा घोडा अडकून ठेवल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा अंगठा येत नसल्यामुळे शेतकरी अनुदाना पासून वंचित असताना सुद्धा प्रशासन त्यावर तोडगा काढण्यासाठी कोणता ही ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांचे अनुदान वाया जाणार की काय असा प्रश्न शेतकऱ्याचा पडला आहे

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ अनुदानाची रक्कम केवायसी विना जमा करण्यात यावी अशी मागणी गोरगरीब जनसामान्य माणसासह शेतकऱ्यातून केली जात आहे 

महाराष्ट्र राज्यातल्या दळभद्री सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचा अंगठा येत नसल्यामुळे केवायसीचा फटका बँकेत अनुदान जमा होत नसल्यामुळे शेतकरी हैराण आहेत परंतु यावर तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान मिळावे सरकार पर्याय काढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक बाबीचा सामना करावा लागत आहे 

Post a Comment

0 Comments