Header Ads Widget

बळेगाव बंधाराच्या पाईप लाईनचे पाणी रुई येथे लिकेज गोदावरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बळेगाव  येथील गोदावरी पात्रात महाराष्ट्र शासनानी कोट्यावधी रुपयाचा बंधारा बांधून शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या लागवडीसाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात व्हावे म्हणून सदरचा बंधारा बांधण्यात आला आहे
जिल्ह्याच्या तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याचे पाणी शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी कोलंबी पर्यंत नेण्यात आले परंतु ते पाणी चालू केल्याच्या नंतर तालुक्यातील रुई बु. येथील शेतकरी गजानन चंद्रकांत वाघमारे यांच्या शेत गट क्रमांक ३७२ मध्ये शंकर भुजंगा शिंदे यांच्या शेतात सदरची पाईप लाईन लिकेज झाल्यामुळे त्यांच्या शेतासह गजानन चंद्रकांत वाघमारे यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन त्यांचे मोठे नुकसान होत आहे

नायगाव तालुक्यातील बळेगाव बंधारा हा गोदावरी पाटबंधारे विभाग नांदेड यांच्या अंतर्गत येत असल्यामुळे सदरच्या कार्यकारी अभियंतासह संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ रुई बु येथे येऊन सदरच्या पाईप लाईनची चौकशी करून एक तर शेतकऱ्यांची नुकसान टाळावी व पाईप लाईन दुरुस्त करून लिकेज होत असलेले पाणी बंद करावे अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे 



Post a Comment

0 Comments