Header Ads Widget

बारूळच्या तळ्यातून सोडण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या रब्बी हंगामासाठी पाण्यात शेकडो घोड झिंग्याचा मृत्यू - अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा !!

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील बारूळच्या तळ्यातून सोडण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या रब्बी हंगामासाठी पाण्यात शेकडो घोड झिंग्याचा मृत्यू झाला असून यात अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा झाला असल्यामुळे नायगाव तालुक्यातील रुई बु पर्यंत कॅनल मध्ये शकडो घोड झिंगे पाण्यात वाहून आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
जिल्ह्याच्या कंधार तालुक्यात बारूळचे मनार प्रकल्प असल्यामुळे या तळ्याचे पाणी रुई बु पर्यंतच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सोडण्यात येते परंतु अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे काल परवा सोडण्यात आलेल्या बारूळच्या तळ्याच्या पाण्याच्या प्रवाहात मोठमोठाले घोड झिंगे  वाहवून आल्यामुळे व पाणी बंद केल्यामुळे सदरच्या पाण्यामध्ये शकडो घोडझिंग्याचा तडफडुन मृत्यू झाला तर काही झिंग्याना पशुपक्षाने खाऊन टाकले आहेनायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले होते या सदरच्या पाण्यामध्ये मोठमोठाले घोडझिंगे वाहवून आले असून काही शेतकऱ्यांच्या शेतात घोडझिंगे तडपताना दिसले तर काही ठिकाणी कॅनल मध्ये खड्डे असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबून त्यातील घोडझिंगे अडल्याने त्यांचा त्याच ठिकाणी पाणी आठुन मृत्यू झाला तर शकडो झिंग्याना बगळे खाताना दिसून येत आहे

बारूळ मनार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अशा बाबीकडे लक्ष देणे गरजेचे होते परंतु अधिकाऱ्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या कॅनलच्या पाण्यामध्ये जिकडे पाहवे तिकडे झेंगेच झिंगे मृत्यूमुखी पडल्याचे चित्र रुई परिसरात दिसून आले आहे 

Post a Comment

0 Comments