Header Ads Widget

हिमायतनगर शहरात महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव हलगीच्या तालावर भंडारा उधळीत भव्य मिरवणुकीने साजरा

हिमायतनगर: नागोराव शिंदे :-

शहरातील बोरगडी रस्त्यावर असलेल्या महाकाली मंदिरात महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव दिनांक 18 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील पंचक्रोशीतून भाविक भक्त, पोतराज यांची आवर्जून उपस्थिती होती
सायंकाळी ४ वाजता हलगीच्या तालावर भंडारा उधळीत शहरातील मुख्य रस्त्याने छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुषांनी उपस्थिती लावली होती.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव मिती मार्गशीष शुद्ध ०६ शके १९४५ चंपाषष्टी दिनांक १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता

सोमवारी सकाळी १०.३० श्री साईनाथ बडवे महाराज यांच्या शुभहस्ते श्री महाकाली मातेचे अभिषेक, गादी, झेंडा व लाड जागेचे पूजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता बंडू देवकर, बाळू देवकर यांच्या हस्ते गादी व छबिना पूजन केल्यानंतर मातेची पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून हलगीच्या तालात व भंडारा उधळीत काढण्यात आली आहे

हि मिरवणूक शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, पोचंमा देवी मंदिर, बारतोंडी देवी मंदिर, तुका देवी मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, संतोषी माता मंदिर, लकडोबा मंदिर, आडेला देवी मंदिर, श्री परमेश्वर मंदिर, पवनसुत हनुमान मंदिर, कालिंका मंदिरातून परत श्री महाकाली मंदिरात आली दरम्यान मिरवणुकीचे ठीक ठिकाणी स्वागत, चहा पाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

या मिरवणुकीत सहभागी चेंद्रारापु च्या धुपता माय चे भक्त पोतराज पाप्पया गायकवाड रशामराव पोतराज, नागोराव पोतराज, सोमाजी पोतराज, बाबुराव पोतराज, सेवक चांदराव बनसोडे व इतर पोतराज मंडळींसह महिला मंडळींनी सहभाग घेऊन हलगीच्या तालावर नृत्य सादर केले आहे

मिरवणूक परत येताच भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर रात्री ९.३०  वाजता गणपत गुरुजीची आरती त्यानंतर पापय्या महाराज पोतराज यांचा जागर होणार आहे. त्यानंतर उत्तर रात्री लाडचा कार्यक्रम व सकाळी ७.०० वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास संस्थापक गुरुपरंपरा प्रेरित गुरू महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवर्य शिवाजी महाराज शिंदे चालगणी तालुका उमरखेड, गुरु दिगंबर महाराज ईठेवाड पार्डी तालुका मूधोळ, यांचे शिष्य निळकंठ बालाजी गायकवाड (देवकर) उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रमास देवकर, पोतराज मंडळी व मानकरी मंडळी देखील आवर्जून उपस्थित झाली होती अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक संजय परमेश्वर मादसवार यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments