नायगाव तालुक्यातील मोजे रुई बु येथे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त समस्त गावकऱ्यांच्या वतीने हनुमान मंदिराच्या पटांगणात यात्रा व कुस्त्यांच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
या बैठकीदरम्यान श्री खंडोबा रायाची यात्रा अतिशय शांततेत पार पाडण्याच्या संदर्भात चर्चा करून गावकऱ्यांच्या वतीने पटीला सुरुवात करण्यात आली आहे
तालुक्यातील रुई बु येथे श्री खंडोबा रायाची यात्रा दरवर्षी शांततेमध्ये समस्त गावकऱ्यांच्या वतीने संपन्न करण्यात येते त्याच पद्धतीने या ही वर्षी श्री खंडोबा रायाची यात्रा शांततेत पार पडण्यासाठी समस्त गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन सदरच्या कार्यक्रमात सहभाग घेतील अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे
रुई बु येथे श्री खंडोबा रायाचा आदर्श गावकऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवून काही दिवसातच येणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने कुस्त्यांची दंगल देखील भरविण्यात येणार असल्याने समस्त गावकरी बंधूनी पट्टीसाठी दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सुरुवात केली आहे

0 Comments