शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान सन्मान योजना ही गेल्या काही वर्षापासून अमलात आली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपये तर एका वर्षात सहा हजार रुपये अशा पद्धतीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे
सदरची योजना अमलात आणली असली तरी शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सदरचे हप्ते पडण्यासाठी लेट लतीफ होत असल्याने शेतकरी हैराण आहेत
दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या काही बँके मध्ये पैसे पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता पडल्याचे सांगण्यात येते परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर ह्या शाखेत अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदरची रक्कम जमा करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांना बँकेत जाऊन व एटीएम द्वारे चौकशी करावी लागत आहे
सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ह्या योजनेतील यंत्रणा कुछ कामी ठरली असल्याचे स्पष्ट दिसून येत असले तरी सदरचा हप्ता तात्काळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे

0 Comments