Header Ads Widget

लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालू देणार नाही पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचा इशारा !!

         माधव पवार 
लोहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या शहरासह इतर ठिकाणी कोणी पोलिसांच्या नजरा चुकून अवैध धंदा चालवण्याचा अथवा करण्याचा प्रयत्न करून कायदा हातात घेतल्यास कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांची गैय केली जाणार असा इशारा लोहा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना रोखठोक दिला आहे 
लोहा पोलीस स्टेशन हद्दी मध्ये कोणत्या ही प्रकारचा अवैध धंदा चालणार नाही अथवा चालू देणार नाही असा दम पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिला असून पोलिसाच्या पेट्रोलिंग मध्ये व गोपनीय माहिती मिळाल्या जेलची हवा खावी लागेल असे ही चिंचोलकर यांनी ठणकावून सांगितले आहे 

ठाण्याच्या अंतर्गत अवैध धंद्या बाबत कोणाला काही ही माहिती असल्यास प्रत्यक्ष येऊन भेटून पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना माहिती द्यावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल अवैध धंदे करणाऱ्यावर तात्काळ  पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे लोहा पोलिसांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments