महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी वृक्षांची लागवड केली जाते परंतु त्या लागवडीच्या माध्यमातून वृक्ष जगलेले दिसले पाहिजे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सदरच्या वृक्षांची लागवड दर वर्षी केली जात आहे
तशाच पद्धतीने महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येत असलेल्या वृक्षांची लागवड हजारो झाडे लावली असल्याचे त्यांच्या अहवालात दिसून येत आहे
परंतु प्रत्यक्षात काहाळा ते सोमठाणा मार्गावर लावण्यात आलेल्या वृक्षाच्या माध्यमातून एक ही झाड जिवंत नसल्याची स्पष्ट चित्र दिसून येत असून सदरची ही वृक्षाची लागवड सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी आंबुलगे यांच्या ढिसाळ नियोजनामुळे वृक्ष लागवडीचा नुसता देखावा करण्यात आला असल्याने सामाजिक वनीकरण विभागात सावळा गोंधळ चालत आहे
या संदर्भात महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची व अधिकाऱ्याची व अंबुलगेची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी बालाजी पवार यांनी केले असून सदरच्या कर्मचाऱ्या कडून महाराष्ट्र शासनाची दिशाभूल वृक्ष लागवडीतून केली जात आहे

0 Comments