Header Ads Widget

घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा मंदीरात पुन्हा चोरी तीन दानपेटया फोडून दान पेटीतील ऐवज व एक दान पेटी ही चोरट्यांनी पळवली पोलीस उपअधीक्षक हनपुडे पाटील यांची घटनास्थळी भेट !!

         माधव पवार
नायगाव येथील प्रसिद्ध असणारे श्रीक्षेत्र खंडोबा मंदिराचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून चोरी केली 

सदर चोरीची घटना दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी झाली. याबाबत आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी नागरिकांच्या लक्षात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस तथा गावचे प्रभारी सरपंच वसंत सुगावे पाटील यांनी कुंटुर पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक बहात्तरे यांना सदरील चोरीबाबत माहिती दिली .त्यानंतर पोलीस उपअधीक्षक हनपुडे पाटील, व सहायक पोलीस निरीक्षक बहात्तरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे

पोलीस प्रशासनाने श्वान पथक सोबत आणले होते.या चोरीमध्ये चोरट्यांनी मंदिरातील तीन दानपेटया फोडून यातील  देणगीची  रोख रक्कम ,चांदीचे दागिने असा अंदाजे एक लाख रुपयांचा ऐवज चोरी केला असून यातील एक दान पेटी ही चोरट्यांनी लंपास केली आहे. 
      
या अगोदर दिनांक ३ जून २०२३ रोजी पहिल्यांदा व आता चारच महिन्यांनी दुसऱ्यांदा चोरी झाल्यामुळे गावकऱ्यांत व भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.या अगोदर झालेल्या चोरीचा आजपर्यंत तपास लागलेला नसतानाही आता दुसऱ्यांदा चोरी झाली विशेष म्हणजे दोन्ही चोरीच्या घटना सी. सी. टीव्ही फुटेज मध्ये कैद झाल्या असून हे दोन्हीही सी. सी. टीव्ही फूटेज पोलीस प्रशासनाला दिले आहे.
    
या मंदिरातील दोन्ही चोरी प्रकरणाचा व गावात होणाऱ्या छोट्या मोठया चोऱ्यांचा तपास लावून चोरट्यांना जेरबंद करा अशी मागणी गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.




Post a Comment

0 Comments