हिमायतनगर : नागोराव शिंदे -
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचे पडसाद हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उमटले असून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण दि २८ ऑक्टोबर पासून सुरुवात केली आहे.या साखळी उपोषणास पळसपुर येथील समाज बांधवांनी कला पथकाच्या माध्यमातून आज भेट देऊन आपल्या गावातील असंख्य मराठा समाजा सोबत जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी पळसपुर येथील सकल मराठा समाज व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठा आरक्षणावर कार्यक्रम सादर करताना शाहिर मारोती शिलेवाड, रामराव शाहिर वानखेडे,प्रभाकर वानखेडे, यांना सहकार्य म्हणून सदाशिव वानखेडे, गजानन वानखेडे, रघुनाथ वानखेडे,श्रीरंग वानखेडे, प्रल्हाद वानखेडे, ढोलकी वादक पांडुरंग वानखेडे यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या गायनातुंन मराठा आरक्षणावर गायनाच कार्यक्रम सादर केले
आरक्षण मीळे पर्यंत राजकीय पुढार्यांना नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे सकल मराठा समाजाच्या वतीने चुलीत गेले नेते चुलीत गेले आहे
पक्ष मराठा आरक्षण एकमेव आमचे लक्ष या स्वरूपाचे फलक जागोजागी मुख्य रस्त्यावर लावून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावामध्ये गावबंदी करण्याचा निर्णय येथील सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.असल्याचे आमच्या नायगाव फास्ट न्यूज शि बोलतांना बोलतांना शाहिर रामराव वानखेडे यांनी सांगितले आहे

0 Comments