Header Ads Widget

अवैद्य मटन चिकन दुकानावर लोहा पोलिसांची कारवाई ९ जनावर गुन्हे दाखल पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची माहिती

         माधव पवार
लोहा शहरामध्ये मटन चिकन विकणार्‍यांना लोहा नगरपालिकेने मोंढ्या मध्ये जागा ठरवून दिलेली असताना सुद्धा नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागी मटन चिकनचे दुकाने न लावता लोहा शहरामध्ये सर्वत्र दुकाने लावली आहेत यामध्ये मुख्यत्वे करून पालम रोड, कंधार रोड बेरळी रोड गावातील मुख्य रोड, या ठिकाणी दुकाने लावली जात आहे या ठिकाणी उघड्यावर दुकाने लावून त्या ठिकाणी सर्वांना दिसेल अशाच पद्धतीने जनावरांची पक्षांची कत्तल केली जाते, त्यातून निघणारी घाण ही तसेच आजूबाजूला पसरलेली आहे 

अशा दुकान चालकांना पोलिसांकडून वारंवार नोटीस देण्यात आली होती तरी त्यांनी आपले दुकान नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागी लावले नाही त्यामुळे लोहा पोलिसांनी आज यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १०५,११७ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हालसे पी एस आय सोनकांबळे,पोलीस हवालदार कदम यांनी केली असून 
तसेच काल गुटखा तंबाखूजन्य पदार्थावर कारवाई करून आठ जनावर गुन्हे दाखल केले, तर काल दारूचा छापा मारून एक दारूचा गुन्हा दाखल केलाआहे 

पुन्हा दारूच्या दुकानावर छापे मारून १ गुन्हा दाखल केला असून अजून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

अवैध धंद्याचा समूळ नाश करण्यासाठी लोहा पोलिसांतर्फे तीन वेगवेगळे पथक स्थापन करण्यात आले आहेत लोहा पोलिसांकडून शहरात कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा चालू देणार नाही असे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments