Header Ads Widget

उ.बा.ठा. शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी विठ्ठलभाऊ ठाकरे यांची निवड


हिमायतनगर  :- नागोराव शिंदे - 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हिमायतनगर तालूका प्रमुख पदी  जेष्ठ शिवसैनिक विठ्ठलभाऊ ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अनेक वर्षां पासून शिवसेनेचे निष्ठेने काम करणाऱ्या विठ्ठलभाऊ ठाकरे यांना उ बा ठा शिवसेनेकडून संधी प्राप्त झाली असल्याने परमेश्वर मंदिर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. 

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शब्द प्रमाण होता अनेक जनांच्या नावाची चर्चा ही झाली परंतू अपेक्षेप्रमाणे विठ्ठलभाऊ ठाकरे यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

नूतन तालूका प्रमूख यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी पक्षप्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जिद्दीने काम करीत आहेत.

त्यांचे हात बळकट करण्यासठी तळागाळातील लोकांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचविण्याचे काम करणार आहे

 स्व बाळासाहेबांनी दिलेली ८०% समाजकारण व २० % राजकारण ही शिकवण अंगीकारून शिवसेनेचे काम जिल्हाप्रमुख नागेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत राहणार असल्याचे नूतन तालुकाप्रमुख विठ्ठलभाऊ ठाकरे यांनी सांगीतले.  ठाकरे यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments