नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यासाठी एकूण १३ कोटी रुपये मंजूर करून घेतला असून सदरच्या रस्त्याचे कशा पद्धतीने करण्यात येत त्यांची शूटिंगच्या माध्यमातून चौकशी व पूर्वी हा रस्ता कशा स्वरूपाचा आता कसा होत आहे यांची व्हिडीओ शूटिंग करण्यात आली आहे
तालुक्यातील घुंगराळा ते रुई बु बळेगाव हा रस्ता गेल्या अनेक वर्षा पासून शासन दरबारी धूळ खात होता या रस्त्याची दाखल नायगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांनी हा रस्ता मोठया परी कष्ठाने मंजूर करून घेतला आहे
या रस्त्याचे काम ही चालू करण्यात आले असलेले सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव या अधिकाऱ्याच्या ढिसाळ नियोजनामुळे कामावर शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली नसल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
घुंगराळा ते बळेगाव रुई बु हा रस्ता जनतेच्या सेवेसाठी व वहान धारकासाठी सध्याच्या परिस्थितीत चांगला झाला असून या कामाचे गुत्तेदार मनोज पाटील मोरे टाकळीकर यांनी सर्व यंत्रणा कामावर राबविली असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्याचे कामावर लक्ष नसल्यामुळे अनेक कामात मागील १० ते १५ दिवसाखाली कामावरच्या यंत्रनेला अडथळा निर्माण झाला आहे
अद्याप तरी नाल्याचे मार्काऊट देण्यात आले नसल्यामुळे आमदार राजेश पवार यांनी देऊन सदरच्या अधिकाऱ्याना सूचना कराव्यात अशी मागणी होत आहे

0 Comments