नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील ओमकार आनंदराव बावणे यांच्या कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकी जपत व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःचे बलिदान समाजाला अर्पण करणाऱ्या बावणे कुटूंबाना एक लाख रूपायाची मदत आमदार राजेश पवार केली आहे
तालुक्यातील भोपाळा येथील सदरच्या विध्यार्थथानी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काल परवाच बलिदान दिले होते त्या कुटुंबीयांना धिर आमदार राजेश पवार यांनी दिला त्याच बरोबर ओमकारचा छोटा भाऊ सुरज आनंदराव बावणे यांचा पदविपर्यतचा शिक्षणाचा खर्च उचलून बावणे कुटुंबीयांचे सुखदुःखात सदैव सोबत असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले आहे
संपूर्ण राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा विषय सर्वत्र चालु असुन मराठा तरुन मोठ्या प्रमाणात नैराश्याच्या वाटेवर आहेत पण स्वतः चे आयुष संपवुन भावनिक होऊन टोकाचे पाऊल कोणिही उचलु नये सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर सकारात्मक असुन तरूणाईने कोणतेही चुकीचे पाऊल ऊचलु नये हि विनंती आमदार पवार यांनी केली आहे
यावेळी भास्कर पाटील भिलवंडे (सामाजिक कार्यकर्ते) तालुकाध्यक्ष दता पा ढगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे ,बाबासाहेब पा हंबर्डे, श्रीहरी देशमुख , शिवव्याख्याते सोपान कदम, सचिन पाटील टाकळीकर, शिवा पाटील गडगेकर ,सुनिल पाटील शिंदे, परमेश्वर पा कदम, रामेश्वर पा जाधव, साईनाथ पा हेंडगे, नामदेव पा शिंदे यावेळी उपस्थित होते
यावेळी पंढरी पाटील डाकोरे धनंजय पा जाधव, रामदास पाटील ,अमोल पा केरले, सुदर्शन देशमुख,राजु बेळगे ,विजय मलदोडे स्वप्निल पा बावणे, रमाकांत सुर्यवंशी,माधव कोरे भोपाळचे सरपंच संतोष बावणे हनुमंत बावणे, जगनाथ बावणे, भाऊसाहेब बावणे,प्रकाश हेडगे,संतोष बावणे,पाडुरंग बागडे,साई बावणे, सह गावातील अनेक समाज बांधव उपस्थित होते

0 Comments