Header Ads Widget

एक तर मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा सत्ता सोडा राज्यातील मंत्र्यासह खासदार व आमदारानी राजीनाम्याला सामोरे जा - गजानन पाटील शिंदे

         माधव पवार
महाराष्ट्राच्या राज्यकर्त्याकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने एका महिन्याचा अवधी मागितला होता परंतु मराठा समाजाने तब्बल ४० दिवसाचा अवधी देऊळ सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लक्ष दिले नाहीत ही दुर्दैवी बाब आहे

४० दिवसाचा कालावधी संपून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिले नसल्याने तमाम मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे

या राज्यातील दळभद्री राज्य सरकार केवळ मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाखाली दिशाभूल करीत असल्यामुळे एक तर मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा सत्तेतून बाहेर पडा म्हणजेच राजीनामे या राज्यातील मंत्री संत्री खासदार आमदारांनी घेऊन मोकळे व्हावे असा इशारा रुई बु नगरीचे माजी सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिला आहे

राजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एका आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे मध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते आपापलं बोलू निघून जायचं ! त्यावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणाले होते यश तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्र्यांना सांगतात माईक चालू आहे 

राज्याच्या राज्य सरकारला आपलं आपण बोलून जायचं यश हे या सरकारला स्वस्त नाही महाग पडले असल्यामुळे दिनांक २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी ग्रामीण भागात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून व त्याच बरोबर सरकारची झोप उडवण्यासाठी गावा गावात शपथविधी घेतली जात आहे

तर पुढार्‍यांना गावबंदी व येणाऱ्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा सभेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्धार करण्यात आला अशी माहिती गजानन पाटील शिंदे यांनी दिली आहे


Post a Comment

0 Comments