Header Ads Widget

कुंटूरच्या शांती निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी तुकाराम सूर्यवंशी लातूरात चमकला

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील शांती निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंटूर शाळेचा विद्यार्थी तुकाराम नागोराव सूर्यवंशी यांनी दिनांक २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत चमकला असून त्यांनी इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेत आहे
सदरच्या विद्यार्थ्यांनी ८०० मीटर व १५०० मीटर धावणे या दोन्ही स्पर्धेमध्ये सदरच्या विद्यालयाला घवघवीत यश प्राप्त करून दिले अशी माहिती शाळेचे शिक्षक निळकंठ शंकरराव पांडे यांनी दिली आहे 

तालुक्यातील कुंटूर येथील शांती निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचा यशवंत विद्यार्थी तुकाराम नागोराव सूर्यवंशी यांनी सदरचे यश लातूरमध्ये प्राप्त करून दिल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष विद्यमान राजेश देशमुख कुंटूरकर यांनी विद्यार्थ्यासह मुख्याध्यापक सर्व शाळेतील शिक्षक वृदं यांचे अभिनंदन केले आहे 

कुंटूर येथील शांती निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचा विद्यार्थी तुकाराम नागोराव सूर्यवंशी यांनी 
धावण्याच्या दोन्ही स्पर्धेमध्ये विभागातून प्रथम क्रमांक मिळविला आहे

त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विद्यमान राजेश गगांधरावजी देशमुख कुटूंरकर व युवा नेते रूपेश भैया देशमुख कुटूंरकर तसेच प्राचार्य पाटील एम. व्ही. सर  व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी या यशस्वी विध्यार्थाचे त्याच्या मार्गदर्शक क्रिडा  शिक्षक श्री पांडे सर  यांचे अभिनंदन केले आहे त्याला राज्य स्तरावर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत







Post a Comment

0 Comments