महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे २ ठिकाणी रेड करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे दोन गुन्हे दाखल करून हजारोचा मु्देमाल जप्त केला असून एकूण ३९३
आरोपी/व्यक्ती वर कारवाही करून सदर प्रकरणात एकूण ४ लाख ८४ हजार रुपयाचा मु्देमाल जप्तची कारवाई करण्यात आली आली आहे
मटका जुगार चालवनाऱ्यावर 4 ठिकाणी रेड करून चार गुन्हे दाखल केले यामध्ये १ लाख १९ हाजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
रहदारीस अडथळा करणाऱ्या व रोडवर वाहने उभे करणाऱ्या ८ वाहनावर व त्याच्या मालकावर आयपीसी ३८३ प्रमाणे गुन्हे ८ दाखल करण्यात आले.
रोडवर अस्ताव्यस्त वाहन लावणारे, वाहणावर दादा काका मामा असे फॅन्सी नंबर टाकणारे रोमिओ टीव्हीशन शाळा क्लासेस परिसरामध्ये फिरणारे अशांचे वाहन चेकिंग करून एका महिन्यात 284 वाहनचालकांवर केसेस करून 1,95,050 रुपयाचा दंड आकारण्यात आला.
तर वाहनावर नंबर न टाकणे दादा काका मामा लिहिणे अशी एकूण 34 वाहने जप्त करून पोलीस स्टेशनला लावली.
सार्वजनिक ठिकाणी असभ्यवर्तन करणारे, शाळा कॉलेज परिसरामध्ये विनाकारण फिरणारे शर्टाच्या गुंड्या मोकळ्या सोडून फिरणारे सार्वजनिक ठिकाणी आरडाओरोड करणारे अशा एकूण 22 आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 110/112/117 प्रमाणे खटले दाखल करण्यात आले.
येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीस वाहनास अडथळा होईल अशा पद्धतीने ज्यांनी आपल्या दुकानाचे सामान रोडवर लावले हात गाडी दुकाने रोडवर उभी केली अशा एकूण 28 आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 102 /117 प्रमाणे खटले दाखल केले.
तर माननीय न्यायालयाकडून एकूण दहा गुन्ह्यामध्ये आरोपींना तात्काळ हजर करून शिक्षा लावण्यात आल्या.
2007 चा सोळा वर्षापासून फरार असलेला आरोपी लोहा पोलिसांनी शोधून काढून जेल ला पाठवला.
गोमास वाहतूक करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्याकडून एक ऑटो सह एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत मासाची दुकाने उघड्यावर लावणाऱ्या 11 दुकानदारांना नोटीस देऊन त्यांना नगरपालिकेने नेमून दिलेल्या जागी दुकाने लावण्यासाठी तंबी दिली.
स्वच्छ भारत स्वच्छ लोहा अभियानांतर्गत संत गाडगेबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत लोहा शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. पोलीस स्टेशन पालम येथे जबरी चोरी करून पळून जाणारे 5 आरोपी लोहा पोलिसांनी पकडून पाल्म पोलिसाच्या ताब्यात दिले व त्यांनी चोरलेली 50 हजाराची अंगठी फिर्यादीस परत दिली.

0 Comments