मराठा समाजाच्या डोळ्याचे पाणी पुसण्यासाठी आता राजकीय पुढाऱ्यानी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत असले तरी खासदार असो की आमदार असो राजीनामे देऊन चालणार नाही प्रथम मराठा समाजाला आरक्षण देऊन राजीनामा द्या अशी चर्चा आता मराठा समाजातून होताना ऐकावयास मिळत आहे
मा.शिवराज पाटील होटाळकर यांचा यांचा पहिला राजीनामा
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी मराठा समाजाला आरक्षण जो पर्यंत मिळणार नाही तो पर्यंत त्या पदावर काम करणार नाही असा रोखठोक निर्णय घेऊन मराठा समाजाच्या कार्यकर्त्या सोबत राहणार असल्याचे मत मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी व्यक्त करीत जिल्ह्यातुन पहिला राजीनामा सादर केला आहे
हिंगोली जिल्ह्यातुन खासदार हेमंत पाटील यांचा पहिला राजीनामा -
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठ कडे पाठवला असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे नाही या राज्यातील सर्व खासदार आमदारानी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण मिळेल याकडे लक्ष केंद्रित करून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
या राज्यातले तीन तोंडी सरकार दळभद्री असल्यामुळे व मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याने मराठा समाज अगदी आरक्षणासाठी घायळ झालेला दिसून येत असला तरी सरकार या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मराठा समाजासाठी भेडसावत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ बोलाचा भात आणि बोलाची कढी असल्याचे बोलल्या जात आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे आज घडीला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर डब्बल उपोषण करण्याची वेळ आली त्यामुळे खासदार असो की आमदारानी राजीनामे देऊन चालणार नाही आरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

0 Comments